HW News Marathi
महाराष्ट्र

अक्षय कुमारचा नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात, भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक | अभिनेता अक्षय कुमारचा नाशिकचा खासगी दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी मिळाली? तसेच, ग्रामीण भागात त्याला शहरी पोलिसांचे संरक्षण का? याप्रकरणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला हेलिपॅडसाठी परवानगी कोणी दिली? हॉटेल्स बंद असताना अक्षयसाठी रिसोर्ट उघडे कसे झाले? मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री गाडीतून फिरत असताना, अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी? असे सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केले आहेत. शहरात पोलिसांचा हद्दीचा वाद सुरू असताना ग्रामीण भागात शहर पोलिसांचे एसकोर्ट कसे ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

अक्षय कुमार खासगी हेलिकॉप्टरने नाशिकला आला होता. नाशिकमधील सपकाळ नॉलेज हबच्या हेलिपॅडवर त्याचं आगमन झालं. या दौर्‍यादरम्यान तो परिसरातीलच एका खासगी रिसोर्टमध्ये मुक्कामीदेखील थांबला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांची दणक्याने सुरूवात,सुजित मिणचेकर विजयी !

News Desk

…असं असेल तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू!

News Desk

शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही, नारायण राणेंचा गंभीर आरोप

News Desk