HW News Marathi
महाराष्ट्र

कल्याणराव, सगळ्यांना एकत्र करुन निर्णय घेऊ म्हणाले हा… पवारांचे मिश्किल उत्तर

 

पंढरपूर | भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीच्या वाटेवर जाण्याचे संकेत दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आणि चर्चा पाहायला मिळत आहे. पंढरपूरच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कल्याणराव, सगळ्यांना एकत्र करुन निर्णय घेऊ, असं म्हणत शरद पवारांनीही कल्याणरावांच्या पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले. सरकोली येथे आज (१८ डिसेंबर) झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे शरद पवारांसोबत एकाच मंचावर उपस्थित होते.

वयाच्या ऐशीव्या वर्षातही तरुणांना लाजवेल असा उत्साह शरद पवारांमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतंच राजीव आवळे यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या उत्साही व्यक्तिमत्ताचा दाखला दिला होता. तुम्ही आता मला वडिलधारे म्हणू शकता, असं पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

“सगळ्यांनी एकत्र येेत निर्णय घेऊ. कल्याणराव, सगळ्यांना म्हटलंय हं.. सगळ्यांना बरोबरीत घेऊन निर्णय घेऊ. सगळे येतात, एकत्र चर्चा करतात, त्याचं काय वेगळं होणार आहे का?” असं पवार मिश्किलपणे म्हणाले होते.

कल्याणराव काळे नेमकी काय म्हणाले होते?

कल्याणराव काळे यांनी या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याचीही चांगलीच चर्चा आहे. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करु, असं काळे म्हणाले. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल, चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्माचाऱ्यांची अवस्था मिल कामगारांप्रमाणे करण्याचा डाव; पडळकरांचा सरकारवर आरोप

News Desk

महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवार यांनी NDA सोबत यावे, आठवलेंचा पवारांना सल्ला

News Desk

मिलिंद एकबोटेला काळं फासण्याचा प्रयत्न

News Desk