HW News Marathi
देश / विदेश

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती?

नवी दिल्ली | मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यासाठी दिल्लीपर्यंत काँग्रेसचे नेते गेले होते. दरम्यान, विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निश्चित मानली जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाई जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसात होणार असल्याचंही समजत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या अध्यक्षपदासाठी वेगवेगळे नेते जोरदार लॉबिंग करत होते. त्यात मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, वर्षा गायकवाड यांचाही समावेश होता. मुंबईतील नेत्यांची दिल्लीत ये-जा वाढली होती. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्लीवारी देखील केली होती. त्यात आता भाई जगताप यांनी बाजी मारल्याचं समोर येत आहे.

कोण आहेत भाई जगताप?

अशोक जगताप यांची भाई जगताप या नावाने ओळख आहे. तर भाई जगताप काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषद आमदार म्हणून निवडून आले. जगताप यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. भाई जगताप याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

विशेष म्हणजे भाजपने आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मराठमोळ्या अतुल भातखळकरांकडे जबाबदारी दिली आहे. त्यात आता काँग्रेसनेही भाई जगताप यांची निवड जवळपास निश्चित करुन मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही मराठी विरूद्ध मराठी विरूद्ध मराठी नेते अशी झाली तर काही नवल नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत शेतकरी आंदोलन तापलं,मोबाईल इंटरनेट सेवा केली बंद 

News Desk

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक भारतीय जवान शहीद

News Desk

हिंदू-मुस्लिम एकत्र आल्याशिवाय देश मजबूत होणार नाही- रामदास आठवले

Gauri Tilekar