HW News Marathi
देश / विदेश

शांततेच्या मार्गाने चाललेल्या शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे मोठे प्रयत्न, मात्र… !

नवी दिल्ली । दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या रोखठोक या सदरातून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे, या सदरात संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या या ३ कृषी कायद्यांची समीक्षण केले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही याबाबतची भूमिका यात स्पष्ट केली आहे. “शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून जे ३ कायदे मोदी सरकारने आणले ते नक्की काय आहेत?” हे लोकांनी समजून घ्यायला हवेत असे आवाहनही यात संजय राऊत यांनी केले आहे.

शांततेच्या मार्गाने चाललेल्या शेतकरी आंदोलनाला भडकविण्याचे, बदनाम करण्याचे मोठे प्रयत्न मात्र… !

“पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न नाहीत असे आपल्या प्रिय मोदी सरकारने ठरवून टाकले आहे. ८ डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी देशव्यापी बंद यशस्वी करुन सरकारला आव्हान दिले. दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेने, अहिंसक मार्गाने चालले. परंतु त्यांना भडकविण्याचे आणि बदनाम करण्याचे प्रयत्न कसोशीने झाले मात्र त्याचा परिणाम आपल्यावर होऊ न देणारे असे आंदोलन मी प्रथमच पाहिले. पंजाबातील शेतकरी हे अतिरेकी आणि खलिस्तानी आहेत हा पहिला आरोप, शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे हा दुसरा आरोप. हे सर्व आरोप पचवून दिल्ली-हरयाणाच्या सिंधू बॉर्डरवर शेतकरी लढत आहे. माणूस हा शेवटी जगण्यासाठीच मुख्यत्वे झगडत असतो. शेतकरी वेगळे काय करीत आहेत? शेतकऱ्यांच्या संदर्भात जे कायदे नव्याने निर्माण केले ते शेतकऱ्यांचे अस्तित्व, स्वाभिमान मारुन टाकणारे आहेत. मोदी सरकराने संसदेत ते घाईने मंजूर केले. त्यावर धड मतदान होऊ दिले नाही. आवाजी मतदानाने मंजूर केलेले हे कायदे शेतकऱ्यांनी फेकून दिले आहेत”, असे संजय राऊत ‘रोखठोक’मध्ये म्हणतात.

मांडली शरद पवारांची भूमिका

देशभरातील शेतकरी ज्याविरोधात पेटून उठले त्या मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांबाबत शरद पवारांची भूमिका मांडताना संजय राऊत म्हणतात, “शरद पवारांनी १० वर्षांपूर्वी शेती कायद्यातील सुधारणेची भूमिका मांडली तेव्हा त्यात शेतकरी हिताचाच विचार होता. त्यावेळी अंबानी-अदानी यांनी शेती क्षेत्रात प्रवेश केला नव्हता. बड्या उद्योगपतींचा हा पसारा गेल्या ६ वर्षात वाढला आहे. शेतीमालाविषयी नवे धोरण आणि कायदे शेतकऱ्यांचे दिवाळे काढणारे आहे. सर्व काही तोट्यातच चालले आहे. शेती पिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात झालेली भरमसाठ वाढ व त्यामानाने मिळणारे कमी दाम यामुळे शेती ही किफायतशीर राहिलेली नाही, तर धोकाच बनला आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याच्या हाय एक्सप्लोझीव्ह कारखान्यात वायू गळती

News Desk

“सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली”, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

News Desk

CPMचे महासचिव सीताराम यचुरी यांना पुत्रशोक

News Desk