HW News Marathi
देश / विदेश

माझ्या ‘फडणवीस’ असण्यामुळे शरद पवारांनीही भूमिका बदलल्या !

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘द इनसायडर’साठी लेखक आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. या मुलाखतीत “शरद पवारांनी भूमिका बदलण्याला तुमचे ‘फडणवीस’ असणं जबाबदार आहे का ?”, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “फडणवीस आडनाव असल्यामुळे काय-काय भूमिका बदलतात, हे मी खूपदा अनुभवले आहे. मग ते शरद पवार असोत किंवा इतर कुणीही. हे काय जातीचा अभिमान बाळगण्याचे दिवस नाहीत, मला माझ्या कर्तृत्वाचा अभिमान आहे”

‘माझ्या ‘फडणवीस’ आडनावामुळे शरद पवारांनीही भूमिका बदलल्या’ हे सांगताना देवेंद्र फडणवीस असे म्हणाले कि, “फडणवीस आडनाव असल्यामुळे काय-काय भूमिका बदलतात, हे अनेकदा अनुभवले आहे. मग ते शरद पवार असोत किंवा इतर कोणीही. मात्र, मला याचा आनंद आहे कि या गेल्या ५ वर्षांत माझ्यावर टीका करायला फक्त हे एकच शस्त्र होते. त्यांना माझ्यावर टीका करण्यासाठी फक्त माझ्या जातीचाच उपयोग करावा लागला. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या, मानणाऱ्या नेत्यांच्या अशा पुरोगामित्वाचा बुरखा फाटला. मी माझ्या जातीचा अभिमान बाळगण्याचे हे दिवस नाहीत. मात्र, मला माझ्या कर्तृत्वाचा अभिमान आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्यंकय्या नायडुंनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

News Desk

#Article370Abolished : काश्मीरमधून कलम ३७० रद्द, विभाजन विधेयक लोकसभेत मंजूर

News Desk

मैत्रिणीवर बलात्कार करून व्हिडीओ टाकला पॉर्न साइटवर

News Desk