मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा डिजिटल माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. हा सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. योग दिवस घरीच कुटुंबासमवेत साजरा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने ‘घरी योग, कुटुंबासमवेत योग’ याला प्रोत्साहन दिले आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२१ जून) देशाला संबोधित केले. कोरोना आपल्या श्वसन संस्थेवर हल्ला करतो. यामुळे आपल्या श्वसन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगाची मोठी मदत होते. यासाठी अनुलोम विनुलोम प्राणायम आहे, असे मोदी म्हणाले.
#COVID19 attacks our respiratory system.'Pranayam', a breathing exercise is something that helps us the most in making our respiratory system strong: Prime Minister Narendra Modi #InternationalYogaDay https://t.co/xm7EFZNl7U
— ANI (@ANI) June 21, 2020
मोदी म्हणाले, “आंतरराष्ट्रीय योग दिन हा एकजुटीचा दिवस असून हा विश्वबंधुतेचा संदेश देणारा दिवस आहे. जो आपल्याला एकत्रित जोडतो आणि एकत्रित आणतो तो योग असतो. लहान मुले, युवा, मोठी माणसे, कुटुंबातील जेष्ठासोबत एकाच वेळी योगाच्या माध्यमातून जोडले जात असताना संपूर्ण घरात एका उर्जेचा संचार होत असतो. कोरोना संकट काळात जगभरातील लोकांनी My Life-My Yoga या व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेत ज्या प्रकारे सहभाग दर्शवला आहे, ते दाखवून देते. आपल्याकडे योगाचा उत्साह वाढत आहे. यावेळेसचा योग दिन भावनात्मक योग दिन देखील आहे, आपली कौटुंबिक एकता वाढवण्याचा दिवस आहे.
स्वामी विवेकानंद म्हणायचे की एक आदर्श व्यक्ती तो आहे जो नितांत निर्जन स्थितीतही क्रियाशील असतो आणि अत्याधिक वेगवान आयुष्यात देखील पूर्ण शांतीचा अनुभव घेतो. कोणत्याही व्यक्तीसाठी ही एक मोठी शक्ती आहे. योगामुळे आपल्या आयुष्यात ऊर्जा मिळते. योग करणारी व्यक्ती कधीही घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणे हेच तर योगा आहे. योगा सर्व भेदभावांच्या वर आहे. तो कुणीही करू शकतो, असे देखील पंतप्रधानांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.