HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही आता उद्धव ठाकरेंकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो !

मुंबई | शिवसेनेचा आज (१९ जून) ५४ वा वर्धापन दिन. राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे उद्धव ठाकरेंकडे आल्यानंतरचा हा शिवसेनेचा पहिलाच वर्धापनदिन त्यामुळे तो अधिक विशेष ठरला. या निमित्ताने, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना एक मोठा निर्धन उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. “भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार”, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केले. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आज एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो”,असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या ५४ वर्धापनदिनानिमित्त शिवसैनिकांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, “हिमालयाच्या संकटालाही महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो. आपल्यासोबत राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. पण तो प्रयत्न आपण मोडीत काढला आणि म्हणूनच आज मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आहे. आता भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार”, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील मोठे विधान केले. “आम्ही आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो आहोत. आता केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे”, अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संतोष बांगर पुन्हा निवडून आल्यास मी माझी सर्व संपत्ती दान करेन’; युवासेना कार्यकर्त्याचं आव्हान

Manasi Devkar

“…तर उद्या माझी पुन्हा ब्रेकिंग न्युज होईल!”, अजित पवारांचा पत्रकारांना मिश्किल टोमणा

News Desk

राज्यांचे ब्रँडींग करताना कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा! – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Aprna