HW News Marathi
महाराष्ट्र

… नाहीतर १०५ आमदार घेऊन तुम्ही घरी का बसला असता ?, रुपाली चाकणकरांनी सुनावले

मुंबई । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना “सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का?” असा सवाल केला होता. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाचा आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी समाचार घेतला आहे. “स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे. चंद्रकांत दादा, अजून काही स्वप्नं आहेत, ती साकार होताना तुम्हाला पाहायची आहेत”, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या सुप्रिया सुळेंवरील टिकेला प्रत्युत्तर देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का ? असा सवाल केला. एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायला हवी की, आजपर्यंत फक्त पवार कुटुंबानेच स्वप्नातलं सत्यात उतरवलं आहे. नाहीतर त्यांना १०५ आमदार घेऊन घरी कशाला बसावं लागलं असतं. त्यामुळे जे अशक्य ते शक्य करुन दाखवले त्याला एक वर्ष झालं. चंद्रकांत दादा, अशी अजून काही स्वप्नं आहेत ते साकार होताना तुम्हाला पाहायची आहेत. आपली वैफल्यग्रस्त, नैराश्यजनक मानसिकता आम्ही समजू शकतो, आपणच सत्तेत येण्याची दिवा स्वप्नं पाहायची सोडून विरोधात आहोत हे सत्य स्वीकारावं.”

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

दरम्यान सुप्रिया सुळेंवर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, “राज्य सरकार अपयशी ठरले आहे. सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही आणि त्यातच, पंतप्रधान मोदी हे राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्या स्वप्नात आहेत का?”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘खाल्ल्या मिठाला जागावे’, सुप्रिया सुळेंचा सुजय विखे-पाटलांना टोला

Aprna

कृषी कायद्यात बदल होणं आवश्यक, दुरुस्ती विधेयक मांडा!

News Desk

गेली २०-२५ वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीची पालिकेत सत्ता आहे… सुप्रिया सुळेंच्या आरोपावर महापौरांची प्रतिक्रिया!

News Desk