HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्युटमध्ये दाखल

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात सिरम इन्स्टिट्युटला भेट देणार आहेत. संपुर्ण जगाचे लक्ष ज्या कोरोना लसीकडे लागले आहे त्याची पाहणी करण्यासाठी आज मोदी पुण्याला आले आहेत. त्यांचे पुण्याच्या विमानतळावर आगमन झाले असुन ते अदार पूनावला यांच्या सिरम इन्स्टिट्युटमध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान, आज मोदी या लसीबद्दल काय महत्वाची माहिती देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. आज अहमदाबाद, हैदराबाद असा दौरा करत मोदी पुण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच कोरोनापासून मुक्ती मिळेल का याचे उत्तर मोदींच्या आजच्या भेटीवर अवलंबून आहे. तसेच, त्यांच्या या भेटीसाठी इन्स्टिट्युट बाहेर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

झायडस कॅडिलाला भेट दिल्यानंतर मोदी म्हणाले….

“आज अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कचा दौरा करुन, स्वदेशी DNA आधारीत लशीबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या टीमचे मोदींनी कौतुक केले. या प्रवासात भारत सरकार त्यांच्यासोबत मिळून काम करत आहे” असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे. मोदींनी लस निर्मितीचे काम समजून घेताना झायडसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धारावीत आज ४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, एकूण आकडा ३३० वर

News Desk

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना झाला कोरोना !

Arati More

कोरोनाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक नेत्यांनी पुढे यावे !

News Desk