मुंबई | राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडेसाहेब काळजी घ्या. तुम्ही लवकर बरे होऊन पुन्हा पहिल्यासारखे लोकांच्या सेवेसाठी मैदानात याल, असा विश्वास आहे, असे ट्वीट केले आहे.
.@dhananjay_munde साहेब काळजी घ्या. तुम्ही लवकर बरे होऊन पुन्हा पहिल्यासारखं लोकांच्या सेवेसाठी मैदानात याल, असा विश्वास आहे. तुमच्या पाठीशी सर्वांच्या सदिच्छा आहेत!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2020
रोहित पवार म्हणाले, “धनंजय मुंडेसाहेब काळजी घ्या. तुम्ही लवकर बरे होऊन पुन्हा पहिल्यासारखे लोकांच्या सेवेसाठी मैदानात याल, असा विश्वास आहे. तुमच्या पाठीशी सर्वांच्या सदिच्छा आहेत!” धनुभाऊ, कोरोनाग्रस्त !! त्यांना लवकर बरं वाटावं म्हणून प्रार्थना आणि शुभेच्छा,” असे भाजप नेत्या यांनी चित्र वाघ यांनी ट्वीट केले आहे.
धनुभाऊ, कोरोनाग्रस्त !!
त्यांना लवकर बरं वाटावं म्हणून
प्रार्थना आणि शुभेच्छा…@dhananjay_munde pic.twitter.com/tLJGEf3Jw7— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 12, 2020
मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात धनंजय मुंडे त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. सध्या धनंजय मुंडे यांच्यासह सर्वांवर सध्या उपचार सुरु आहेत.
कोरोनाची लागण होणारे महाविकासआघाडीतील तिसरा नेता
महाविकसाआघाडी सरकारमधील धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहे की, ज्या कोरोनाची लागण झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसरे नेते ज्यांना कोरोनाची लागण झाली. याआधी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या दोघांनी कोरोनावर मात केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.