HW News Marathi
महाराष्ट्र

‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधींना सोनिया गांधी, राहुल गांंधीसह पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली | भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 35 वी पुण्यतिथी आहे. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांच्या नवी दिल्लीतील १, सफदरजंग रोड, येथील निवासस्थानी अंगरक्षकांनी गोळी घालून त्यांची हत्या केली होती. इंदिरा गांधी यांनी १९६६ पासून ते १९७७ दरम्यान सलग तीन वेळा त्यांनी देशाची धुरा सांभाळली. यानंतर १९८० मध्ये त्या पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.

गांधींच्या पुण्यतिथीनिमिताने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी शक्तिस्थळावर जाऊन इंदिरा गांधींना आदरांजली वाहिली. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट केलं आहे. “आज माझी आजी इंदिरा गांधी यांचा बलिदान दिवस आहे. तुमचे पोलादी निश्चिय आणि निर्भीड निर्णयांची शिकवण ही प्रत्येक पावलावर माझे मार्गदर्शन करत राहते. तुम्हा शत् शत् नमन,” असे राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटद्वारे इंदिरा गांधींना श्रद्धांजली दिली. इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या वतीने देशभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरा गांधींना १९७१ मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते. एक कणखर नेत्या, ‘आयर्न लेडी’ म्हणून इंदिरा गांधींचा जगभरात लौकिक आहे. आणीबाणी, ऑपरेशन ब्लू स्टार यांसारखे धाडसी निर्णय इंदिरा गांधींच्याच काळात भारताने घेतले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अवकाळी पावसामुळे राज्यातील ३२५ तालुक्यांमध्ये तब्बल ५४ लाख हेक्टर शेतीचे नुकसान

News Desk

जेव्हा तुमचा बाप मान झुकवून इंग्रजांचे तळवे चाटत होता…

swarit

यंदाचा गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम निर्बंधमुक्त; गणपती मुर्तीच्या उंचीवरील मर्यादा हटवली!

Aprna