HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस म्हणतात, शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे !

मुंबई | शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहे. जर माझे वडील असते तर ते त्याच वयाचे असते. शेवटी प्रत्येक बापाला हेच वाटते की, आपल्या पोराला आपल्यापेक्षा कमी समजते. पोरगा कितीही पुढे गेला तरी बापाची तिचे भावना असते, असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस हे आज (११ जून) आणि उद्या (१२ जून) कोकण दौऱ्यावर आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसाग्रस्त भागाच्या पाहाणी करणार आहे.

फडणवीस म्हणाले, “शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. आज माझे वडील हयात असते तर तेही शरद पवार यांच्याच वयाचे असते. प्रत्येक बापाला वाटते की मुलाला माझ्यापेक्षा कमीच कळते. मुलगा कितीही पुढे गेला तरीही बापाची तिच भावना असते,’ हे वृत्त टीव्ही ९ या वाहिनीशी बोलताना ते म्हटले.

“फडणवीस येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या ज्ञानात भर पडेल, ” असा टोला शरद पवार यांनी लगावली होता. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, “शरद पवारांचे जे म्हणणे आहे मी ऐकले. मी विदर्भातला आहे, मी समुद्राची पाहणी करायला चाललो आहे. मात्र मी अनेकदा बारामतीत गेलो आहे. मात्र तिथे मला काही समुद्र दिसला नाही.” “जर आपल्याला बीसीसीआयचा अध्यक्ष व्हायचे असेल तर तेंडूलकर आणि गावस्करला प्रशिक्षण द्यावे अशी अट नाही,” असा चिमटाही फडणवीस यांनी शरद पवारांना काढला.

शरद पवार नेमके काय म्हणाले

देवेंद्र फडणवीस यांच्य कोकण दौरा करणार आहे, असा सवाल काल (१० जून) पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला होता. त्यावर पवार म्हणाले, “कोकणात किती नुकसान झाले आहे. हे सर्वांना कळले पाहिजे. प्रत्येक जण वेगळ्या भागांतून येतो. मी बारामतीच्या दुष्काळी भागातला आहे. ते नागपुरातले आहेत. समुद्राचा आणि नागपूरचा काही संबंध नाही. त्यामुळे सगळ्यांच्या ज्ञानात भर पडेल. आमच्याही पडते आहे. फडणवीस यांच्या ज्ञानात भर पडेल ही चांगली गोष्ट आहे.”

संबंधित बातम्या

फडणवीस येत आहेत चांगली आहे, त्यांच्या ज्ञानात भर पडेल !

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराजांविरोधात संगमनेरच्या न्यायालयात खटला दाखल

News Desk

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीची धाड

News Desk

मुंबई पाठोपाठ आता अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

News Desk