HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

मुंबई | माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी काल (१० जून) राजू शेट्टी यांची त्यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र, राजू शेट्टींनी आपल्याला विदानपरिषदे ऐवजी राज्यसभेवर नियुक्त करावी, अशी इच्छा राजू शेट्टींनी जयंत पाटील यांना बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेवर जावे, अशी इच्छा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, राजू शेट्टी हे राज्यसभेवर जाण्यास इच्छुक आहेत. शरद पवार यांच्या इच्छेला मान देत राजू शेट्टी विधानपरिषदेवर जाणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजू शेट्टी यांनी मागील लोकसभा निवडणुकीवेळी भाजप व मित्र पक्षांच्या सहकार्याने निवडणूक लढवली होती. पण तीन वर्षानंतर राजू शेट्टींचे भाजपसोबतचे संबंध बिघडले. यानंतर राजू शेट्टींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करण्यास सुरू केला. तेव्हापासून ते काहीसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे झुकले होते. लोकसभा निवडणूक त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना अपयश आले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांविरोधातील कारवाईवरून राहुल गांधींची सरकारवर टीका

News Desk

PandharpurElection : आघाडी पिछाडीचा खेळ सुरुचं, समाधान आवताडे १६व्या फेरी अखेर आघडीवरच!

News Desk

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा गेम प्लॅन तयार

News Desk