HW News Marathi
राजकारण

भाजपने लोकसभेवेळीच ठरलेला ५०-५० चा फॉर्म्युला मान्य करावा !

मुंबई | “राज्याच्या सत्तेच्या वाटाघाडीत अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हा शब्द दिला नव्हता”, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये केला आहे. त्यानंतर, कुठेतरी राज्याचे राजकारण ढवळून निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले. “पुढील ५ वर्षेही मीच मुख्यमंत्री राहणार”, या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शिवसनेनेचे खासदार संजय राऊत संताप व्यक्त केला. “मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही,” अशी टीका मुख्यमंत्र्यांवर केली. इतकेच नव्हे तर याच पार्श्वभूमीवर नुकतीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेची बाजू स्पष्ट केली आहे.

“मुख्यमंत्री पदाबाबतच्या बोलणीसाठी आज दुपारी 4 वाजता मुंबईत शिवसेनेचे सुभाष देसाई, संजय राऊत तर भाजपच्या भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर यांच्यात चर्चा होणार होती. मात्र, हि बैठक रद्द झाली. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ही पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे, मुख्यमंत्र्यांनी आपला दिलेला शब्द फिरवल्याने ही बैठक रद्द झाल्याचे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • ५०-५० चा फॉर्म्युला भाजपने मान्य करावा.
  • मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने बैठक रद्द.
  • ५०-५०चा फॉर्म्युला लोकसभेवेळीच ठरला होता.
  • संजय काकडे नक्की भाजपचे आहेत का ?
  • ५०-५० नसेल तर चर्चा कशावर करायची ?
  • आता वेळ कोणती ? हीच ती वेळ का ? याची सर्व उत्तरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देतील
  • आम्ही कोणाकडून हिसकावून घेत नाही. जे ठरलंय ते द्या.
  • ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद हा शिवसेनेचा हक्क
  • शिवसेनेकडेही अन्य पर्याय आहेत.
  • सामना वाचावाच लागतो.
  • सामनाची दखल घ्यावी लागते. सामना वाचाल तरच वाचाल.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा भीमा-कोरेगाव विजय दिवसासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

News Desk

अजित पवार अन् शरद पवार आज बारामतीत, कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी होणार चर्चा?

swarit

मोदींनी ‘आयएनएस विराट’प्रकरणी राजीव गांधींवर केलेले आरोप पूर्णपणे खोटे !

News Desk