HW News Marathi
महाराष्ट्र

बीड ऍसिड हल्ल्याप्रकरणी धनंजय मुंडेंकडून पोलीस प्रशासनाला कठोर कार्यवाहीचे निर्देश

बीड । बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीवर झालेल्या ऍसिड हल्ला आणि जळीतकांड घटनेच्या निषेधार्थ राज्याचे सामाजिक न्याय व विशेस साहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे याबाबतच्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “नांदेड जिल्ह्यातील तरुणीवर बीड जिल्ह्यात प्रवासात असताना घडलेल्या ऍसिड व जळीतकांड या संतापजनक प्रकरणाची जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सदर प्रकरणी आरोपींना अटक करून कठोर कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश जिल्हा पोलिस प्रशासनास दिले आहेत”, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेता भरत जाधवची मुख्यमंत्र्यांना ‘ही’ विनंती

News Desk

पंकजा मुंडेंना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार-चंद्रकांत पाटील

News Desk

काँग्रेसचे राज्यव्यापी ‘जीवनदान महाअभियान’ रक्तदान शिबिर ! | बाळासाहेब थोरात

News Desk