HW News Marathi
महाराष्ट्र

जयंत पाटील यांचा दौर्‍याने कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी..!

मुंबई | राजकीय वर्तृळात सध्या विरोधी पक्षाकडून वारंवार महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते नारायण राणे यांनी आघाडी सरकारवर टीका केली होती. शिवसेनेला कोकणातून काढून टाकू असेही म्हटले होते. तर, आघाडी सरकारमधील इतर पक्षांनाही वारंवार सुनावले आहे. दरम्यान, कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाही, भवितव्यही असे भाकिते अनेक राजकीय पंडित करत होते आज त्याच कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा खासदार आहे, आमदार आहे, मंत्री कार्यरत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या चाणाक्षपणामुळे कोकणात मंत्री कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकांचं आकलन करत जयंत पाटील यांनी विधानसभेत अचूक उमेदवारांची निवड केली आणि कोकणात बाजी मारली. गेल्या दोन दिवसापासून जयंत पाटील कोकणात तळ ठोकून होते. पक्षाच्या तालुकानिहाय पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला. जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच रात्री उशिरापर्यंत जलसंपदा विभागाची बैठक घेऊन आलेल्या निवेदनांचा निपटारा केला. या दोन दिवसात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पक्षाच्या अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना मोठा दिलासा, चौकशी तूर्तास बंद

News Desk

#Coronavirus : धारावीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच, आकडा ११७ वर

News Desk

दारुड्यांचा हल्ल्यात जखमी झालेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णींची चौकशी केल्याबद्दल सर्वांचे मानले आभार

News Desk