HW News Marathi
Covid-19

दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट !, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती 

नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा नियंत्रणात येत असल्याचे चित्र असे तरीही राजधानी दिल्लीतील कोरोनास्थिती दिवसेंदिवस होत असल्याचे आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनंतर चिंता आणखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा अधिक प्रमाणात वाढ असून दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याविषयी बोलताना म्हणतात कि, “दिल्लीत कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा एका मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. माझ्या मते आपण याला दिल्लीतील कोरोनाची तिसरी लाट म्हणू शकतो. सातत्याचे आमचे कोरोनाच्या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची काही गरज नाही. आम्ही आवश्यक ती सर्व पाऊलं टाकणार आहोत”, असे केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, दिल्लीत मंगळवारी (३ नोव्हेंबर ६ हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर गेल्या ५ दिवसांपासून दररोज तब्बल ५ हजारांहुन देखील अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे विभागातील ६७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, एकूण संख्या २ हजार ५७४ वर

News Desk

राज्यातील शाळा- काॅलेज ३१ मार्चपर्यंत बंद !मुख्यमंत्र्यांचे आदेश

Arati More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार

News Desk