HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ६ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’, रिकव्हरी रेटही ९० टक्क्यांवर

मुंबई | राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी जारी केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी आज (३ नोव्हेंबर) दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ४ हजार ९०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे याच एका दिवसात ६ हजार ९७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान राज्यात आतापर्यंत तब्बल १५ लाख ३१ हजार २७७ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सद्यस्थितीत एकूण १ लाख १६ हजार ५४३ ऍक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून आता महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ९०.४६ % इतका झाला आहे. दरम्यान, राज्यात एकीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना नागरिकांनी जबाबदारीने वागणेही महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड जिल्ह्यात आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याबाबत खासदार प्रितम मुंडे यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

कोरोनावरील उपचारासाठी अशोक चव्हाण लिलावती रुग्णालयात दाखल

News Desk

सामान्यांसाठी लोकल प्रवास सुरु होण्याची चिन्हे, आय़ुक्तांचं सूचक वक्तव्य

News Desk