HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (४ ऑक्टोबर) संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहे.

संजय दिना पाटील यांना राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. दिना पाटील यांना मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात संजय दिना पाटील यांचा शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच शिवसेनेकडून विठ्ठल लोकरे यांनी मानखुर्दमधून अर्ज भरला असला तरी रिपाइंकडून गौतम सोनवणे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे.

संजय दिना पाटील यांचा अल्पपरिचय

संजय दिना पाटील यांनी २००९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तिकीटावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि १५ व्या लोकसभेत विजय मिळवून खासदार बनले होते. परंतु २०१४ मध्ये मोदी लाटेमुळे त्यांचा पराभव झाला आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मनोज कोटक यांच्याकडून ते पराभूत झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राऊतांच्या पक्षाकडे जितके आमदार, त्यापेक्षा जास्त दलित बांधव भाजपचे खासदार! – राम सातपुते

Aprna

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा!

News Desk

१०वी, १२वी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

News Desk