HW News Marathi
महाराष्ट्र

संघाच्या कार्यक्रमाकडे देशाचे लक्ष, प्रणव मुखर्जी करणार भाषण

नागपूर | संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपासाठी आज नागपूरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपूरमध्ये आज होणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समारोप सोहळ्याला देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. ते बुधवारी या सोहळ्याच्या निमित्ता नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. संगाच्या विचारमंचावरुन कॉंग्रेसच्या विचारधारेत घडलेले प्रणव मुखर्जी उपस्थितांना नक्की काय मार्गदर्शन करणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या नागपूर येथील कार्यक्रमातील उपस्थितीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधान आले होते. या विषयी मुखर्जींना प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारले असता जे बोलायचे आहे ते नागपूरमध्ये बोलेन असे म्हणत त्यांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना बगल दिली होती. गेल्या अनेक दिवसांच्या चर्चेनंतर मुखर्जी नागपूरमध्ये नक्की काय बोलणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे देखील यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमानंतर स्मृतिमंदिरातच प्रणव मुखर्जी हे सरसंघचालक आणि संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसमवेत भोजनदेखील करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रेशीमबाग मैदानावर संध्याकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीनंतरही राज्यातील भारनियमन बंद राहणार

Gauri Tilekar

सातारा जिल्ह्यातील बोंडारवाडी धरणासाठी आवश्यक निधी देणार! – उपमुख्यमंत्री

News Desk

आधी चीन-अतिरेक्यांना उखडून फेका, मग महाविकासआघाडीकडे वळा!

swarit