HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुचर्चित असे स्मारक अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे. मात्र, शिवस्मारकाच्या कामात सत्ताधारी भाजप सरकारने घोटाळा केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केला आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आरोपाने एकच खळबळ माजली आहे.

शिवस्मारकातील गैरव्यवहाराबाबत प्रकल्पाची एक वीटही न रचता ८० कोटी रुपये खर्च केले गेले. हे पैसे देण्यासाठी दबाव आणल्याचा अधिकाऱ्यांचा लेखी पत्रात दावा आहे. सरकारने शिवस्मारकाची १२१.२ मीटर उंची कायम ठेवताना पुतळ्याची उंची कमी केली आणि तलवारीची उंची वाढवली. स्मारकाची जागाही कमी करण्यात आली, अशी माहिती सावंत आणि मलिक यांनी परिषेत दिली.

तसेच मलिक आणि सावंत पुढे बोलताना म्हणाले, टेंडर दिल्यानंतर कामात बदल करता येत नाहीत. मात्र, शिवस्मारकाच्या कामात बदल केले गेले. हे करताना तांत्रिक समितीची परवानगीही घेतली नाही. २ जूनला या विभागाच्या लेखापालने आपल्या हस्ताक्षरात एक नोट लिहिली आहे. शिवस्मारकात झालेली वाटाघाटी ही मार्गदर्शक तत्वांना धरुन नाही. शिवस्मारकाचे काम सुरु राहीले तर हलक्या प्रतीचे काम होईल असे या पत्रात म्हटले आहे.

शिवस्मारक घोटळ्याची न्यायालयीन चौकशी – राष्ट्रवादी-काँग्रेस

या संपूर्ण प्रकाराची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केली आहे. अनियमितेची चौकशी व्हावी. यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र लिहणार असून अनियमितेत केवळ अधिकारी सहभागी नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही या घोटळ्यात सहभाग आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पंतप्रधान असते, तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता !

News Desk

येत्या दोन दिवसांत युतीसंदर्भात घेणार निर्णय | उद्धव ठाकरे

News Desk

जब तक खेल खतम नही होता आपुन इधरीच है !

News Desk