HW News Marathi
महाराष्ट्र

‘शट अप या कुणाल’च्या दुसऱ्या सिझनला शिवसेना खासदार संजय राऊतांच्या मुलाखतीने होणार सुरुवात

मुंबई | स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा आपल्या ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहे. दरम्यान, या मुलाखतीची पूर्वतयारी म्हणून हॉटेल ग्रॅंड हयातमध्ये या दोघांनी भेट घेतली. कुणाल कामराने संजय राऊतांची भेट घेत या मुलाखतीवर जवळपास दीड तास चर्चा केली आहे. येत्या आठवड्यात खार येथील एका स्टुडिओत या मुलाखतीचे चित्रीकरण होणार आहे. त्यामुळे ‘सामना’तून जे मुलाखत घेतात ते संजय राऊत आता स्व:तच्या मुलाखतीत काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कुणाल कामरा हा नेटीझन्समध्ये चांगलाच प्रसिद्ध असलेला कॉमेडियन आहे. कुणाल स्टॅण्ड अप कॉमेडीसोबतच ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात मोठमोठ्या सामाजिक तसेच राजकीय व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो. तसेच अनेकदा तो सोशल मीडियावर ट्रोलही झाला आहे. पहिल्या सिझनच्या पहिल्या भागात कुणालने भाजप यूथ विंगचे उपाध्यक्ष मधुकिश्वर देसाई यांची मुलाखत घेतली होती. तर दुसऱ्या सिझनची सुरुवात संजय राऊत यांच्यापासूनच करणार अन्यथा नाही, असे म्हणत त्याने सोशल मीडियावर राऊतांना मुलाखतीसाठी काही दिवसांपूर्वी आमंत्रण दिले होते. संजय राऊत यांनीही कुणाल कामराचे हे निमंत्रण स्वीकारत मुलाखतीस येण्याचे मान्य केले होते.

कुणालने आतापर्यंत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (तत्कालीन काँग्रेस प्रवक्त्या), जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सुर्या यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दहीहंडीला मान्यता द्यायची नव्हती मग बैठक कशाला?”, बाळा नांदगावकरांचा सवाल

News Desk

गीता वाटण्याऐवजी निकाल वेळेवर लावा | उद्धव ठाकरे

News Desk

ई पास रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय!

News Desk