HW News Marathi
महाराष्ट्र

आता ईडीकडून नितीन सरदेसाईंची देखील चौकशी होणार

मुंबई | कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी झाल्यानंतर आता मनसे नेते नितीन सरदेसाई यांना देखील ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. २२ ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांची ईडीकडून तब्बल ८ तासांहुनही अधिक वेळासाठी चौकशी झाली होती. दरम्यान, राज ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेश जोशी यांनाही ईडीकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

आता मनसे नेते आणि राज ठाकरेंचे निकटवर्तीय नितीन सरदेसाई यांना देखील ईडीकडून चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी ईव्हीएमविरोधात विरोधकांची एकजूट करून आवाज देखील उठवला होता. म्हणूनच राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप देखील विरोधीपक्षांनी केला होता.

नेमके काय आहे प्रकरण ?

सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला ८६० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी कोहिनूरसाठी जागा खरेदी घेतली होती. त्यासाठी आयएलएफएसकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यानंतर आयएलएफएसचे मोठे नुकसान झाले होते. पुढे २००८मध्ये राज यांनी शेअर्स विकून या कंपनीतून अंग काढून घेतले होते. मात्र त्यानंतरही राज या कंपनीत सक्रिय राहिल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राची सरकार शहानिशा करणार

News Desk

राज्यात गेला महिनाभर सुरु ‘कोरोना’चा हाहाकार

News Desk

तासाभरात कर्मचाऱ्यांना मिळणार २ महिन्यांचा पगार  आणि दिवाळी बोनस – अनिल परब

News Desk