HW News Marathi
मुंबई

ऐन उन्हाळ्यात राणीच्या बागेतील प्राण्यांचे हाल

मुंबई | मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागण्यात आहेत. यात सुट्टीमध्ये मुले राणीबाग बघण्याचा हट्ट पालकांकडे धरतात. प्राणी पहायला गेल्यानंतर पाणी व उपचार विना त्यांचे हाल हाल होत असल्याचे आरोप पर्यटक करत आहेत. काळवीट,नीलगाय,सांबर अक्षरशः पाण्याविना धापा टाकत आहेत असे काहीसे चित्र सध्या राणीच्या बागेत दिसत आहे. प्राण्यांना पाणी नाही आणि तिथे असलेल्या बागेसाठी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. प्राण्यांना उन्हाचा त्रास कमी व्हावा यासाठी त्यांना बसण्यासाठी असलेले पाण्याचे हौद अक्षरशः कोरडे ठाक पडलेले दिसत आहेत. तसेच निधीच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

परदेशातून आणलेल्या पेंग्विनसाठी सर्व सुख सुविधा आहेत. मात्र आपल्या देशी प्राणी व पक्ष्यांसाठी त्यांना मिळणाऱ्या माफक सुविधाही योग्य मिळत असल्याचे दिसत नाही. पाणघोडयाचे पिल्लू हे योग्य उपचार न मिळाल्यामुळे दगावले असल्याची शक्यता आहे. त्यासाठी लागणारी डार्ट गन नसल्यामुळे तसेच त्याला बेशुद्ध करणे शक्य झाले नाही व उपचारविना ते मृत झाल्याचे विभागीय नागरिक म्हणत आहेत. प्राणी पक्ष्यांची दुरवस्था होत असून तुटलेल्या पिंजऱ्यामुळे कावळे आत शिरकाव करत आहेत. या सर्व बाबतीत उद्यान प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.

वृद्ध लोक आम्हाला राणीबागच्या बाहेर जाणारा रस्ता, फलक नसल्यामुळे सापडत नाही. अशा तक्रारी वारंवार करूनही त्याकडे लक्ष देणे उद्यान प्रशासनाला गरजेचे वाटत नाही. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार फलक लावणे बंधनकारक आहे. तरीही सर्व ठिकाणी फलक दिसत नाहीत. फलक लावण्यासाठी उद्यान प्रशासन ८ लाख खर्च करणार आहेत. प्राण्यांसाठी तसेच तात्पुरत्या स्वरूपात पिंजऱ्यांच्या डागडुजीसाठी फंड का वापरला जात नाही. येत्या 2 वर्षात प्राण्यासाठी नवीन पिंजरे तयार करण्यात होईपर्यंत पक्ष्यांची दुरावस्था होत राहणार. तसेच पेंग्विनकडे जाणारे फलक नाहीत.

मुले राणीबागेत आल्यावर आपल्या आई बाबांना वाघ ,सिंह कुठे आहेत. हा प्रश्न सर्रासपणे विचारत असल्याचे चित्र राणीबागेत दिसत आहे. पेंग्विनपेक्षा भारतातील प्राण्यांना महत्त्वा देणे गरजेचे होते. प्राणी आणण्याची मागणी येणारे पर्यटक करत असतात.

लक्ष्य प्रतिष्ठानचे आरोप

अजगराच्या पिंजऱ्यात पाण्याचे छोटा हौद रिकामा असल्याची तक्रार लक्ष्य प्रतिष्ठान करत आहे. मगरींच्या संख्येबाबत विभागीय नागरीकांमध्ये चर्चा सुरू आहे. तसेच पक्ष्यांचे पिंजऱ्यांमध्ये कावळे मोठ्या प्रमाणात असतानाचे दृश्य दिसते.जे प्राणी मृत होतात त्याची कोणतीही माहिती बाहेर पोहचत नाही असाही आरोप लक्ष्य प्रतिष्ठान करत आहे. प्राण्यांच्या गैरव्यवस्थेबद्दल व त्रुटींबद्दल आयुक्तांना तक्रार अर्ज करून त्यावर दखल न घेतल्याची खंत लक्ष्य प्रतिष्ठानचे राजेश देशमुख व राजेश पवार यांनी व्यक्त केली.

प्राणी संग्रहालयाने आरोप फेटाळले

पहिल्या टप्प्यात पेंग्विन व त्याच्या इमारतीचा विषय मार्गी लागला.तसेच इतर प्राणी पक्षांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. निलगाय उन्हामुळे धापा टाकत असेल .पण प्राण्यांच्या खाद्य दालनात मुबलक पाणी व अन्न दिले जाते.बाहेर पाणी ठेवले तर त्यांना आजाराची लागण होऊ शकते. 14 ते 15 कोटींचा खर्च येत असून त्यातील सर्व रक्कम ही वापरण्यात येते. सुधारणा ,प्राण्यांची आजारपणे,त्यांचे खाणे तसेच इतर सर्व खर्चासाठी हा निधी वापरात जात असल्याचे प्राणी संग्रहालय संचालक संजयकुमार त्रिपाठी म्हटले.

आमच्याकडे डार्ट गन होती, पण त्या पानघोड्याच्या पिल्लाला प्रादुर्भाव झाला होता. त्याचा उपचार पण सुरू होता आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. सर्व प्राणी आणि पक्षावर आमचे योग्य लक्ष आहे. प्राण्यांची कोणतीही दुरवस्था नाही, फक्त त्यांचे पिंजरे जुने झाले असून पण ते दुरुस्त करण्यासाठी जास्त फंड वापरावा लागेल. तो फंड वापरून वाया जाईल.कारण अत्याधुनिक पद्धतीचे पिंजरे आता बनविणार आहोत.

सर्व फलक अत्याधुनिक स्टील मध्ये बनविण्यात येणार आहेत. हे सर्व फलक तात्पुरत्या स्वरूपात आहेत. तसेच पेंग्विनकडे जाणार फलक न लावण्याचे कारण,लोक पेंग्विन बघून निघून जातात.सर्व प्राणी पक्षी बघून उद्यानात सैर करावी हा आमचा उद्देश आहे.तसेच बाहेर जाण्याच्या रस्त्याचे फलक लवकरच लावण्यात येतील.

दुसऱ्या टप्प्यात वाघ,सिह,नीलगाय,तसेच सांबर,हरीण असे 7 पेक्ष्या अधिक प्राणी आणण्यात येणार आहेत.त्याआधी त्यांचे पिंजरे अत्याधुनिक करण्यात येणार आहेत. त्यात वाघाच्या पिंजऱ्यात बांबू,वाहत्या पाण्याचे धबधबे,दगड असे नैसर्गिक पद्धतीचे वातावरण निर्मिती केली जाईल.तसेच प्रत्येक प्राण्यांच्या आवडी निवडीनुसार नवे अत्याधुनिक पिंजरे असतील.

अजगराच्या तिथे असणाऱ्या छोट्या हौदात पाणी असते. स्वच्छतेसाठी 3 दिवस तो रिकामा असल्याचे त्यांनी सांगितले. एका मगरची मृत्यू 3 महिन्यांपूर्वी झाला.त्यात कोणत्याही उपचारा अभावी तिचा मृत्यू झालेला नाही.मगर मगरीच्या झुंजी मध्ये तिचा मृत्यू झाला आहे.

आता दुसऱ्या टप्प्यात पिंजरे अत्याधुनिक रूपात बांधण्यात येणार आहेत.त्याचे काम 15 दिवसात सुरू होणार आहे.काही ठिकाणी जाळ्या तुटल्यामुळे कावळे आत जात आहेत. पण येत्या 2 वर्षात सर्व पिंजरे नवीन रूपात दिसतील.काही पक्षी कावळ्यांना मारतात त्यामुळे कावळे मृत झालेले दिसले.पिंजऱ्याचीही स्वच्छता वेळेवर होत आहे.प्राणी मृत झाल्याची आम्ही वेळो वेळी माहिती दिलेली आहे. त्यात माहिती लपविण्याचे काही कारण नाही. इथे असलेले सर्व प्राणी जास्त वयाचे आहेत.त्यामुळे प्राणी आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे.

सुरक्षा रक्षक व डॉक्टरांची संख्याही पुरेशी आहे.

पेंग्विन इमारत पूर्ण सेंट्रललाईज एसी आहे.राणीबाग आता इंटरनॅशनल पद्धतीने तयार होत आहे .त्यात अनेक परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत.म्हणूनच पेंग्विन इमारत एसी केली आहे.तेथे सेमिनार हॉल आहे.विविध उपक्रम तिथे राबविले जात असतात.त्यामुळे राणीबाग बघायला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.तसेच पूर्ण राणीबागचे नवीन व मनमोहक रूप लवकरच पाहायला मिळेल अशी ग्वाही त्रिपाठी यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

News Desk

शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द

News Desk