HW News Marathi
मनोरंजन

गुलमोहर फुलला

रणरणत्या उन्हात आपले सौंदर्य टिकवून ठेवणारा वृक्ष म्हणून आपण गुलमोहर या वृक्षाकडे पाहू शकतो. गुलमोहरचे शास्त्रीय नाव ‘डिलॉनिक्स रेजिया असे आहे. तर इंग्लिशमध्ये ‘मे फ्लॉवर ट्री’अशा नावाने गुलमोहरला संबोधले जाते. हा वृक्ष अनेक वेगवेगळ्या देशात आढळून येतो. कडक उन्हात फुलणारा गुलमोहर आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे अनेकांना आकर्षित करतो. या झाडाची उंची ५० ते ६० फुटापर्यंत वाढते. गुलमोहराला तीन ते चार वर्षात बहर येतो तो बहरला की एका छत्री सारखा दिसतो.

गुलमोहराला उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल ते मे महिन्यात सुंदर लाल रंगाची फुले येतात. फुले येण्याआधी याची सर्व पाने गळून पडतात. उन्हाळ्यात या झाडाकडे पाहिले की मन प्रसन्न होते.गुलमोहरच्या फुलांना पाच लाल-केशरी पाकळ्या असतात त्या पाकळ्यांवर पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या आकर्षक रेष्या असतात. या रेषा गुलमोहराचे सौंद्रय अधिकच खुलवतात.

भारतातले उष्ण वातावरण गुलमोहर या झाडासाठी पोषक नाही. या झाडाची इतर झाडांप्रमाणे वाढ होते. या झाडाची मुळे जमिनीत फार खोलवर जात नाहीत तर ती वरच्यावर पसरतात आणि झाड वाढताच त्याची मुळे जमीतून मान वर काढतात. गुलमोहरचे झाड बाहेरुन मजबूत दिसते परंतु, ते आतून पोकळ असते. त्याच्या फांद्या इतर झाडांच्या तुलनेत कमकुवत असतात.ढिसूळ असलेल्या या झाडाची वेळोवेळी छाटणी होणे गरजेचे असते. वादळ-वा-यात गुलमोहर सहज उन्मळून पडते.

मुंबई शहरात अनेक ठिकाणी गुलमोहराची उंच उंच आकर्षक अशी झाडे पहायला मिळतात. पण गेल्या पाच वर्षात महापालिकेने मुंबईत गुलमोहराची झाड लावली नाहीत. वाढती लोकसंख्या वाहनांची वर्दळ उंचउंच इमारती अरुंद झालेले रस्ते हे सर्व लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने गुलमोहरची झाडे लावणे बंद केले असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिका-या गुलमोहर झाड पडल्याने झालेल्या दुर्घटनेसंदर्भात माहीती देताना सांगितले. सध्या मुंबईत गुलमोहर ऐवजी भारतीय जातीच्या तामण, कांचन, भावा, आमल, तास, फेलम ट्री आणि अशोक या झाडांची लागवड पालिकेकडून केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरकरांच्या प्रेमाने भारावले बिग बी

News Desk

विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड…

Manasi Devkar

दिलवाले दुल्हनिया ले जाएगेंच्या प्रदर्शनात 22 वर्षानंतर खंड

News Desk