HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार ?

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी (२० ऑगस्ट) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राजे आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या काल रात्री ८.३०वाजता भेटीला गेले. या दोघांमध्ये सुमारे पाऊण तास राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीबरोबरच खासदारकीची पोटनिवडणूक शक्य असेल तर राजीनामा देण्याची तयारीही उदयनराजेंनी दाखवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत असणारा कलह गेल्या काही दिवसात सर्वांच्या समोर आला होता. यातूनच उदयनराजेंचे बंधू आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ लगेचच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे माहिती मिळाली आहे.

याआधी राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, संदीप नाईक, सचिन अहिर, चित्रा वाघ असे अनेक नेते शिवसेना, भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण होते. मात्र आता उदयनराजेही भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत या चिंतेत भर पडली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मावळमधील पराभवामुळे फिका पडला बारामतीचा विजयोत्सव

News Desk

केवळ मुंबई-पुण्यासारख्या शहरांनाच शिवसेनेच्या नेत्यांची नावे शोभतील !

News Desk

राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या मुलाखतीचा मुहूर्त ठरला

News Desk