HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंबाबत आजच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसची आज (२३ सप्टेंबर) महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, खडसेंबाबत आजच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही.

“एकनाथ खडसे यांच्याविषयीची कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली”. तसेच,एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने विचार करावा, असा सल्ला जयंत पाटील यांनी भाजपला दिला आहे. तसेच, भविष्यात खडसे राष्ट्रवादीत येतील का, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी, राजकारणात जर-तरला फार महत्व नसते, असे म्हणत उत्तर देणे टाळले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर उपस्थित होते. तसेच, अनेक दिवस भाजप आणि एकनाथ खडसे यांच्यातील बिघडलेले संबंध पाहता ते राष्ट्रवादीची वाट धरणार का याकडे लक्ष लागले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

News Desk

“लवकरच जाहीर सभा घेणार, सभेत मास्ककाढून सर्वचा सोक्षमोक्ष लावणार”, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

सरकारमधील ओबीसी नेते पवार काका पुतण्यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत! – गोपीचंद पडळकर

News Desk