HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांना आम्ही नोटीस पाठवली नाही! निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण… | SharadPawar | EC

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याचे वृत्त सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते आणि चर्चेचा विषयही ठरला होता. दरम्यान, काल (२२ सप्टेंबर) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत या वृत्ताला शरद पवारांनी दुजोरा देखील दिला होता. पत्रकारांनी त्यांना खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनाही नोटीस बजावल्याचा प्रश्न विचारला असता मलाही आयकर विभागाची नोटीस आली आहे, असे शरद पवार म्हणाले होते. निवडणूक आयोगाकडूनच अत्यंच महत्त्वाची माहिती देत पवारांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचं स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुनच आयकर विभागानं शरद पवार यांच्या नावे नोटीस पाठवली होती. शरद पवारांकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचं यात म्हटलं गेल्याची माहिती समोर आली.

#SharadPawar #ITnotice #ElectionCommission #EDnotice #NCP #AjitPawar #NarendraModi #SupriyaSule #AadityaThackeray #UddhavThackeray #MahavikasAghadi #BJP
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vikhe फक्त Amit Shah यांना नाही तर NarendraModi यांना कुटुंबासोबत भेटले,Chandrakant पाटलांवर अन्याय?

News Desk

Congress-Pravin Gaikwad | प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

News Desk

काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाचा भडका? थोरात,नितीन राऊतांची दिल्लीकडे धाव..कारण काय?

News Desk