HW News Marathi
व्हिडीओ

“सरकार कोण पाडतंय ? अस्तनीत निखारे आहेतच”, राऊतांचा रोख अनिल देशमुखांवर ? | MahaVikasAghadi

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे विधान अप्रत्यक्षरित्या केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे विधान निराधार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून या प्रकरणी भाष्य करण्यात आले आहे.”सरकार पाडणे म्हणजे काय ?सरकारसंदर्भातले काही विषय गुप्तपणे विरोधकांकडे पोहोचवणे व सरकारच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणेत अविश्वासाचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर निगराणी ठेवणे हे गृहखात्याचे काम आहे. ते त्यांनी चोख पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम आहे. सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न कोणताही अधिकारी करीत नाही. ते फक्त मनसुबेच ठरतात, पण अस्तनीत निखारे हे असतातच. सावधगिरी बाळगावीच लागेल!’,’ अशा इशारा सामनामधून देण्यात आला आहे.

“काही झाले तरी भाजपचेच सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण, ते महत्त्वाचे. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले”, असाही आरोप ‘सामना’च्या या अग्रलेखात करण्यात आला आहे. “फडणवीसांचे सरकार कोसळले व महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच. त्यामुळे या मंडळींचे मन खट्टू झाले. आश्चर्य असे की, या काही सहानुभूतीदार अधिकारी मंडळाच्या भरवशावर कोणी सरकार पाडण्याचे मनसुबे पाहत असतील तर ते वेडगळपणाचे ठरेल,” असा इशाराही या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

#AnilDeshmukh #UddhavThackeray #SharadPawar #SanjayRaut #Saamana #Shivsena #NCP #Maharashtra #MahaVikasAghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही वल्लभभाई पटेल आहात का महात्मा गांधी?”; SambhajiNagar वरुन Raj Thackeray यांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

News Desk

Rohit pawar & Sujay Vikhe | पवार-विखे घराण्याचा संघर्ष निवळला,रोहित माझा चांगला मित्र-सुजय विखे

Arati More

विधवा महिलेवर खोट्या तक्रारी करून एवढं नीच राजकारण , Varun Sardesai यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Chetan Kirdat