HW News Marathi
देश / विदेश

थोडक्यात जाणून घ्या आरोग्यसेतू अ‍ॅपबद्दलची माहिती

नवी दिल्ली | देशात पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद केरळमध्ये झाली होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या कोरोनाशी लढण्यास सज्ज झाले. अनेक उपाय केले गेले आणि अजूनही सुरु आहेत. यापैकीच एक उपाय म्हणजे केंद्र सरकारने सुरू केलेले ‘आरोग्यसेतू’ अ‍ॅप हे होय.

हे अ‍ॅप लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींविषयीची माहिती देऊन नजिकच्या काळात तुम्ही अशा कुणा कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला होता का, याबद्दल तुम्हाला अलर्ट करते. आरोग्यसेतू अ‍ॅप सर्व अँन्ड्रॉईड आणि आयओएस उपकरणांवर डाऊनलोड करता येऊ शकते. आणि महत्त्वाचे म्हणजे हे अ‍ॅपफ्री आहे. अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात.

त्याननंतर परदेश प्रवासाचा इतिहास, सर्दी, खोकला, ताप यासारख्या प्रश्नांची हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्यावी लागतात. तुम्हाला कोणता आजार आहे की नाही याबद्दलच्या प्रश्नांचीही उत्तरे द्यावी लागतात. या अॅपमध्ये सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व आणि ते कसे पाळायचे, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शिवाय कोव्हिड-19 आजाराविषयीचे सर्व ताजे अपडेट्सही येत राहतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुठल्याही क्षणी शशिकला यांना अटक होणार

News Desk

निष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड !

News Desk

अमेरिकेत शाळेत गोळीबार 17 ठार

swarit