सुषमा स्वराज नावाचं वादळ आज, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात शमलं. ज्या काळात देशात भारतीय जनता पक्ष मोठ्या अडचणीत होता. पक्षाला राष्ट्रीय पातळीवर नेता नव्हता. त्याकाळात या रणरागिणीनं संसदेत मोठ्या धैर्यानं खिंड लढवली. आज भारतीय जनता पक्षाच्या हातात सगळं आलं. राष्ट्रीय पातळीवर चेहरा आहे. लोकांचं प्रचंड पाठबळ आहे. पण, ज्या काळात काही नव्हतं त्या काळात सुषमा स्वराज होत्या. २००४मध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार गेल्यानंतर भाजपसाठी कठीण कार्यकाळ सुरू झाला होता. पक्षाला संघटनात्मक पातळीवर पुढं घेऊन जाऊ शकणाऱ्या प्रमोद महाजन यांचा अचानक मृत्यू झाला होता. पक्ष संघटना कमकुवत होती. देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीएचं सरकार होतं. पण, बोलबाला काँग्रेसचाच होता. त्या काळात सुषमा स्वराज भाजपचं आशास्थान होत्या.#SushmaSwaraj #BJP #RIPSushmaji
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.