HW News Marathi
महाराष्ट्र

ताज हॉटेलमधील ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई | कोरोनाच्या विळख्याने देशाला कसे बाहेर काढायचे यासाठी सगळेच जम आपापल्या स्थरावर प्रयत्न करत आहेत. या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे हाल होणार नाही यासाठी टाटा समूहाने डॉक्टरांना राहण्यासाठी ताज हॉटेल खुले करुन देण्यात आले होते. मात्र, ताज मधीलच ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यांना कोरोनाची लागण कोणामुळे झाली याचा शोध सुरु असून सध्या या सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णांचे उपचार करताना डॉक्टरांना आराम करण्यासाठी नीट जागाही उपलब्ध नसते, त्यामूळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी ताज समूहाने कुलाबा येथील हॉटेल ताज महल, ब्रांद्र्यातलं ताल लॅंड्स, सांताक्रुझमधील हॉटेल ताज येथे त्यांच्या राहण्याची सोय केली होती. आता, धक्कादायक बाब म्हणजे त्याच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे. ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास आलेल्या काही जणांना लागण झाली होती असे समोर येत असून त्यांच्यामूळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रवी राणांबाबत ठोस भूमिका घ्या अन्यथा… बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

Chetan Kirdat

स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार?

News Desk

सचिन वाझे पोलिस सेवेतून बडतर्फ !

News Desk