HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात येणार ?

अहमदनगर | राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या राष्ट्रवादीने इच्छुक उमेदवारांची मुलाखती करण्यास देखील सुरुवात झाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तिसरी रोहित पवार पिढी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. परंतु रोहित पवारांची ही इच्छा अपुरी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करून मुलाखत दिली आहे. कर्जत जामखेड या मदारसंघासाठी काँग्रेसकडून मागणी केली असून राष्ट्रवादी हा मतदारसंघ सोडण्यास तयार नसल्याने दोन्ही पक्षात या मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. नगरमध्ये काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्यात कर्जत-जामखेडसाठी पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी साळुंखे यांनी उमेदवारी मागितली आहे. या जागेसाठी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेईल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhima Koregaon | आरोपीची चौकशी कुणी करायची ते आरोपी ठरवू शकत नाही

News Desk

जळगावात ‘कमळ’ फुललं 

swarit

चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर समीर वानखेडेंविरोधात घोषणाबाजी

News Desk