HW News Marathi
राजकारण

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर

मुंबई | काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाधा’ या पुस्तकाच आज (३० जुलै) प्रकाशन होणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजप शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप पवार यांनी भाजपवर केला होता. यावरून शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली होती. या वादा सुरू असतानाच हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी दोघेही एका व्यासपीठावर उपस्थित राहणार असून यावेळी दोघेही नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…जेव्हा तुम्हाला परदेशी माध्यमे खरेदी करता येत नाहीत !

News Desk

#LokSabhaElections2019 : पार्थ पवार यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही !

News Desk

पद्मावत सिनेमा पाहण्यासाठी वेळ आणि पैसा वाया घालवू नका – ओवीसी

swarit