HW News Marathi
महाराष्ट्र

शिवेंद्रराजेंच्या मुलाखतीतील अनुपस्थितीवर अजित पवारांनी केली पाठराखण

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसने आज (२५ जुलै) सातारा जिल्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. या सर्व मुलाखती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या आहेत. पवारांनी सुरुवातीला फलटण, कोरेगाव, वाई, उत्तर कराड, दक्षिण कराड आणि पाटण या मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखीत झाल्या. मात्र, साताऱ्यातील विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले या मुलाखतीकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी अर्ज देखील दाखल केला नव्हता. शिवेंद्रराजे अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार यांनी मुलाखती झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतेत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, “शिवेंद्रराजे याच्या अनुपस्थितीत कोणताही अर्थ काढून नका,” असे ते म्हणाले. “पण मी बारामती मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. माझ्याकडून कामाच्या व्यापामुळे अर्ज दाखल करणे राहूल गेले आहे. यामुळे मी निवडणुकीला उभे राहणार नाही, असे होत नाही. तसेच आमचीही चूक असून आम्ही पक्षाकडे अर्ज करायला हवा होता. ही चूक आम्ही नक्की सुधारणार आहे. पण, ज्या ठिकाणी पक्षाचा विद्यामान आमदार इच्छुक आहे. त्या ठिकाणी पक्षातील दुसरे कोणी उभे राहण्याचा प्रश्नच येत नाही.” त्यामुळे साताऱ्यातून शिवेंद्रराजे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. त्यांच्या गैरहजेरी कोणीही उलट सुलट अर्थ काढू नये, असे म्हणत शिवेंद्रराजेंची पाठराण केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे हिंदुंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली, सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं”, संजय राऊत भडकले

News Desk

राष्ट्रवादीने खडसेंना समज दिली नाही तर पदवीधर निवडणुकीत ब्राम्हण समाज मतदान करणार नाही – आनंद दवे

News Desk

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना; नितीन राऊत यांची घोषणा

Aprna