HW News Marathi
महाराष्ट्र

‘ते’ कृत्य करणाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करतो !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज (२५ जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर राष्ट्रवादीसह महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. हा संताप अहिर यांचा शिवसेनेतील प्रवेशावरून नाही तर सोशल मीडियावर पवारांच्या नावाने खोटे मॅसेज लोकांकडून व्हायरल करण्यात आले आहे. पवारांनी हा संताप त्यांच्या ट्वीटर हँडलवरून व्यक्त केला आहे.

“राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांचा मोबाइल माझ्यातर्फे मोफत रिचार्ज करून दिला जाईल, अशी अफवा व्हॉट्सअॅप सोशल माध्यमावरून पसरत असल्याचे मला समजले. काही समाजकंटकांनी पीडित शेतकऱ्यांची केलेली ही क्रूर चेष्टा आहे.” असे ट्वीट पवारांनी केले आहे. पवार पुढे असे देखील म्हटले की, “अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करून मी असे कृत्य करणाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करतो. सायबर यंत्रणेने तत्काळ तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशमुखांना हटवण्याचे बळ मुख्यमंत्र्यांमध्ये नाही!, भाजपची बोचरी टीका

News Desk

अमित शहांनी संपूर्ण भाषणात शिवसेना आणि उद्धव ठाकरे टार्गेट केले हेच आमचे यश – विनायक राऊत

News Desk

‘दोन्ही काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला’, देवेंद्र फडणविसांची टीका!

News Desk