HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपची तिरंगा एकता रॅली

मुंबई | देश ६९व्या प्रजासत्ताक दिनात पदार्पण करत असून संपूर्ण देशात विविध ठिकाणी ध्वजारोहन करुन हा दिवस उत्साहात साजरा झाला. दिल्लीत दरवर्षीप्रमाणे यंदा ही प्रजासत्ताक दिनी राजपथावर देशाच्या लष्कारी सामार्थ्याचे आणि विविध सांस्कृतिकचे दर्शन घडवणारी परेड झाली. पण, यंदा या परेडमध्ये पहिल्यांदाच भारत-आशियाई संमेलनाच्या निमित्ताने १० आशियाई राष्ट्रांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे या परेडची चर्चा सर्वत्र होत आहे.

मुंबई प्रजासत्ताक दिन हा रॅलीमुळे चांगलाच रंगलेला दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, जडयू असे सर्व भाजपा विरोधी पक्ष एकत्र येऊन ‘संविधान बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले. या रॅलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पाटीदार नेते हार्दिक पटेल, माजी केंद्रीय मंत्री फारुक अब्दुला आदी बडे नेते मंडळी या रॅली सामील झाले होते.

जात, पंथ, भाषा या आधारे सामाजिक परिस्थिती बिघडविणा-या स्वार्थी प्रवृत्तींना एकच उत्तर अशी प्रसिद्ध भाजपच्या वतीने करण्यात आली होती. या रॅली मोठ्या संख्येने भाजप कार्यक्रते जय जय शिवाजी, भारत माता की जय, संविधान के सन्मान में भाजपा मैदान में अशा घोषणा करत रॅली मार्गक्रमन करत होती. तसेच देश भक्तीचे गाणे देखील लावण्यात आले होते. तर दुसरीकडे भाजपने काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘तिरंगा एकता’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली भाजपचे मुंबई प्रदेशध्यक्ष आशिष शेलार यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पन करुन यांच्या नेतृत्तवात ही रॅली काढण्यात आली आही. ही रॅली दुपारी ३ वाजता सुरु झाली असून या रॅलीत पक्षाशी निगडीत एक ही गोष्ट घेण्यास शेलार यांनी मनाई केली. रॅली चैत्यभूमी येथून सुरु होणार होती. या थोडा बदल करुन ही रॅली यानंतर स्व. सावरकर मार्ग, संगीतकार सी. रामचंद्र चौक, एम. बी. राऊत रोड, कवी राजा बढे चौक, जे.के. सावंत मार्ग, सेनापती बापट मार्ग ,कविवर्य केशवसूत उड्डापुलावरुन एल्फिन्स्टन रोड येथील हुतात्मा बाबू गेणू क्रीडांगणावर रॅलीने मार्गक्रमन केले होते

या रॅलीत पुरुषाप्रमाणेच महिलांनी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.भाजपा कार्यकर्त्यांनी या रॅलीत राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज पुरोहित आदी भाजपच्या बड्या नेते मंडळींनी हजेरी लावली. या रॅलीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC परीक्षांची तारीख केली जाहीर

News Desk

कोल्हापुरात पराभव दिसताच भाजपाकडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न! – अतुल लोंढे

Aprna

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘शिवडी न्हावाशेवा सी लिंक’ची पाहणी

Aprna
मुंबई

विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीः खा. अशोक चव्हाण

swarit

मुंबई संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष आपला लढा अधिक तीव्र करणार असून विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन खा. चव्हाण म्हणाले की, सत्ताधारी पक्ष सामाजिक वातावरण गढूळ करून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करित आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पोलिसांकडून पाळत ठेवली जात आहे. पण काँग्रेस पक्ष अशा प्रकारांना घाबरणार नाही. संविधान वाचले तरच हा देश वाचेल, त्यामुळे संविधान बदलण्याचे कारस्थान करणा-या या सरकारविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टिळक भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्याला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, खा. हुसेन दलवाई,आ. शरद रणपिसे, आ. भाई जगताप, आ. हुस्नबानो खलिफे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अनुसूचीत जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, यशवंत हाप्पे, राजन भोसले युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, यांच्यासह पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

हायब्रीड बसच्या सामंजस्य कराराला बेस्टची मंजुरी

News Desk

विधानपरिषदेच्या चार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न

News Desk

92 लाख दंड भरण्यास शासकीय अधिका-यांची चालढकल

News Desk