HW News Marathi
मुंबई

हुक्का पार्लर विरोधातील मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची मुंबईत जागृती

सलग दुसऱ्या दिवशी मोहिम सुरु…

तरुण पिढीला व्यसनाधीन बनविणाऱ्या आणि मोठमोठ्या हॉटेलमध्ये आगीचा धोका निर्माण करणाऱ्या हुक्का पार्लर विरोधात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने बुधवारपासून मुंबईभर स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. बुधवारी सकाळी दादर येथे नितेश राणे यांनी स्वत: सही करून या मोहिमेची सुरुवात केली. गुरूवारीही मुंबईतील विविध भागात मोहीम राबविण्यात येत आहे.

मुंबईतील कमला मिल कम्पाऊंडमध्ये आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला होता. ही आग लागली त्याच दिवशी आमदार नितेश राणे यांनी ही आग हुक्का पार्लरमुळे आगलेली असू शकते, अशी शक्यता वर्तविली होती. पुढे आगीच्या तपासात तशी स्पष्ट पुष्टी मिळाली आहे. अशा विनाशकारी हुक्का पार्लरविरोधात आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. ज्या लोअर परेल येथील कमला मिल कम्पाऊंडमध्ये आग लागली होती, तेथेही स्वाभिमानने बुधवारी स्वाक्षरी मोहीम घेतली. कुलाबा, भायखळा, दादर, चेंबूर, वांद्रे, वर्सोवा, अंधेरी, कांदिवली, बोरीवली, भांडूप, मुलूंड, या परिसरात या मोहीमेला विशेष प्रतिसाद मिळाला. १२ जानेवारी पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खाजगी बस अपघातात एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी

News Desk

महापालिकेविरोधात त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा !

News Desk

अनिल परबांच्या अडचणीत वाढ होणार? ‘त्या’ चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा

News Desk