HW News Marathi
मुंबई

शिवनसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या

कांदिवली येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. हल्ला समतानगर परिसरता अशोक सावंत यांच्या घराजवळ करण्यात आला असून याप्रकरणी समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करत आहे.

काही बाईकस्वार हल्लेखोरांनी रविवारी रात्री अकरावाजता अशओक सावंत यांच्यावर हल्ला करून हत्या केली आहे. त्यानंतर त्यांना रूगणालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टराने मृत घोषीत केले. आहे. याप्रकरणी पोलिसंनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईकरांना यंदा पाणी कपातीचे नो टेन्शन

News Desk

मालेगाव बॉम्बस्फोट खटला यूएपीए कायद्या अंतर्गतच

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

News Desk
महाराष्ट्र

तेलंगणा राज्याप्रमाणे राज्यातील शेतक-यांना मोफत वीज द्यावी – धनंजय मुंडे यांची मागणी

News Desk

विदर्भातील संघर्ष यात्रेमुळेच कर्जमाफीची अंमलबजावणी होऊ लागल्याचा दावा

नांदेड महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या छोट्याशा तेलंगणा राज्याला कर्जमाफी ही देता येते आणि मोफत वीज हि देता येते , महाराष्ट्रात मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे सरसकट कर्जमाफीही द्यावी आणि तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 16 जानेवारीपासून मराठवाड्यात काढण्यात येणा-या हल्लाबोल यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मुंडे आज नांदेड ते आले होते कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. शेतकऱ्यांना वाढीव दिलेली विजेची बिले ही मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली .

कापसावरील बोन्ड अळीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल जाहीर केलेली मदत फसवी आहे. बियाणे कंपन्या मदत देण्यास तयार नाहीत त्या मोन्सेटो कंपनी कडे बोट दाखवत आहेत , ही कंपनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल मग शेतक-यांना मदत केंव्हा मिळणार ? असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

या यात्रेदरम्यान नांदेड जिल्ह्यात लोहा , उमरी व माहूर अशा 3 ठिकाणी सभा होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस माजी मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, आ.विक्रम काळे, माजी खासदार गंगाधरराव कुंटुरकर, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस सौ.सोनालीताई देशमुख, शहराध्यक्ष डॉ.सुनिल कदम विक्रम देशमुख, फिरोज लाला, किशोर देशमुख आदी उपस्थित होते.

Related posts

राम मंदिराच्या पायभरणीचा सोहळा दिवाळीसारखा साजरा करावा मात्र कोरोनाचे भान ठेवावे – चंद्रकांत पाटील

News Desk

‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल करू’, प्रविण गायकवाडांना मनसेचा थेट इशारा!

News Desk

संजय राठोड जगदंबा मातेच्या मंदिरात, पोहरादेवीत प्रचंड गर्दी, पोलिसांचा लाठीमार

News Desk