HW News Marathi
Uncategorized

Bhima Koregaon : नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये !

पुणे। कोरेगाव-भीमा शौर्यदिनानिमित्ताने आज विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम पार पडत आहे. आजचा (१ जानेवारी) कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर देशभरातून भीमसागर याठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, “शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी इथे यावे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. एकूण ४०० वरिष्ठ अधिकारी आणि १० हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय कोरेगाव-भीमा परिसरावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनचा वॉचही ठेवण्यात आला आहे. तसेच अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून अनेक दलित कार्यकर्त्यांना जिल्हाबंदीही करण्यात आली आहे. त्याशिवाय कोरेगाव-भीमा परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीही जाहीर करण्यात आली असून आठवडी बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वियय स्तंभाकडे जाण्यासाठी बसेसची सुविधा देण्यात आली आहे.

कोरेगाव भीमाचा इतिहास

कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी १ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० सैनिकांनी पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. त्यात महार रेजिमेंटच्या अनेक सैनिकांना वीरमरण आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव १ जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत-पाक सामना होता फिक्स !

News Desk

काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने फेटाळला राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव

News Desk

मंत्र्यांच्या ‘आधार’ कार्डची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे नाही

News Desk