HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, उद्या ‘हे’ मंत्री घेणार शपथ

मुंबई | राज्यात महाविकासआघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षातील मंत्र्यांच्या नाव शिक्कमोर्तब झाला आहे. मंत्रालयाच्या प्रांगणात उद्या (३० डिसेंबर) मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात पहिल्या टप्प्यात ३६ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या संभाव्य नेत्यांची यादी एच. डब्ल्यू. मराठीच्या हाती लागली आहे.

काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावांवर आज (२९ डिसेंबर) शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात दिल्लीला गेले असून आज (२९ डिसेंबर) काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काँग्रेस आध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चर्चा करून मंत्र्यांच्या नावे निश्चित करणार आहेत. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार चर्चा करण्यासाठी थोरातांसोबत काँग्रेस नेते के. सी वेणुगोपाल आणि खर्गे यांची उपस्थित असणार आहेत. महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून १० कॅबिनेट व ३ राज्यमंत्री असे प्रत्येकी १३ आणि काँग्रेसकडून १० जणांचा समावेश मंत्रिमंडळ विस्तारात केला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री

अजित पवार

दिलीप वळसे पाटील

अनिल देशमुख

जितेंद्र आव्हाड

नवाब मलिक

हसन मुश्रीफ

बाळासाहेब पाटील

धनंजय मुंडे

राजेश टोपे

डॉ. राजेंद्र शिंगणे

दत्ता भरणे

किरण लहामटे

काँग्रेसचे संभाव्य मंत्री

उत्तर महाराष्ट्र

के. सी. पाडवी

मराठवाडा

अशोक चव्हाण

अमित देशमुख

पश्चिम महाराष्ट्र

विश्वजित कदम

प्रणिती शिंदे

विदर्भ

विजय वड्डेटीवार

यशोमती ठाकूर

मुंबई

अमिन पटेल

शिवसेनेतील मंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार

मुंबई

रवींद्र वायकर

सुनील प्रभू

ऍड अनिल परब

ठाणे

प्रताप सरनाईक

डॉ.बालाजी किणीकर

कोकण

उदय सामंत

दीपक केसरकर

भास्कर जाधव

विदर्भ

संजय राठोड

आशिष जयस्वाल

बच्चू कडू ( अपक्ष शिवसेनेला पाठिंबा दिलेले)

उत्तर महाराष्ट्र

गुलाबराव पाटील

दादा भुसे

सुहास कांदे

मराठवाडा

अब्दुल सत्तार

संजय शिरसाठ

डॉ.संदीपन भुमरे

राहुल पाटील

पश्चिम महाराष्ट्र

तानाजी सावंत

शंभूराजे देसाई

प्रकाश अबिटकर

महिला आमदारांमध्ये

डॉ. नीलम गोऱ्हे

मनीषा कायंदे

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं –  देवेंद्र फडणवीस

News Desk

नाहीतर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल…आयुक्तांचा इशारा

News Desk

चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांना ४ कोटी १९ लाख रुपयांचा रखडलेला उदरनिर्वाह त्याचे वाटप

News Desk