HW News Marathi
देश / विदेश

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी प्रविण दरेकर यांची निवड

नाकपूर | विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपने प्रविण दरेकर यांची निवड केली आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस आणि सूरजीतसिंह ठाकूर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी प्रविण दरेकर यांची वर्णी लागली. दरेकर यांनी शिवसेना, मनसेतून भाजपमध्ये आलेले आहे.

प्रविण दरेकर २००९ ते २०१४ पर्यंत मनसेचे आमदार राहिले आहेत. मात्र, २०१४ विधानसभा निवडणुकीत प्रविण दरेकर यांना पराभव झाला होता. दरेकर हे पहिल्यांदाच विधानसभा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले आहे. दरेकर मुंबईच्या मागाठणे मतदारसंघातून विधानपरिषद आमदार आहेत. प्रविण दरेकर विधानपरिषदेवर नवीन असतानाही भाजपने त्यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रवीण दरेकर हे विधानपरिषदेत आपला आवाज घुमवतील.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#Coronavirus : देशाचा आकडा ९३५२ वर, २४ तासांत ९०५ नवे कोरोना रुग्ण

News Desk

वाजपेयींना श्रद्धांजली देण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण

swarit

इस्रोने केले जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk
व्हिडीओ

Pratap Sarnaik | बलात्काऱ्यांना मिळणार २१ दिवसांत फाशी, महाराष्ट्र राबवणार आंध्र पॅटर्न

swarit

बलात्कार प्रकरणातील खटल्यांचे निकाल जलद लागावे यासाठी आंध्रप्रदेश विधानसभेत ३ दिवसांपूर्वीच ऐतिहासिक दिशा विधेयक २०१९ (आंध्र प्रदेश फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम 2019) पारित करण्यात आला आहे. तसाच कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

Related posts

शरद पवारांच्या पंतप्रधानपदाची मोर्चेबांधणी करणारं ‘राष्ट्रमंच’आहे तरी काय?

News Desk

न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्री दिपक केसरकर यांची पत्रकार परिषद

News Desk

Bharat Jodo’ यात्रेमुळे Maharashtra काँग्रेसमध्ये नवी ऊर्जा येईल! Vishwajeet Kadam यांना विश्वास

News Desk