HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेसोबत चंद्रकांत पाटील यांची अर्धातास बंद दाराआड चर्चा

परळी | भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने आज (१२ डिसेंबर) परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या समर्थकांशी संवाद साधणार आहेत. पंकजा मुंडे नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडेंच्या निवसस्थानी जावून त्यांची भेट घेतील आहे. या दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान पंकजा मुंडेची मनधरणी करण्याचा चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री प्रकाश महेता आदी नेते देखील या चर्चेत सामील झाले होती.

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव हा पक्षांर्त लोकांमुळे झाल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी खडसेंनी केला होता. खडसेंनी यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्याकडे जळगावच्या कोअर कमिटीच्या बैठकीदरम्यान या दोघांमध्ये झालेल्या चर्चांमध्ये त्यांनी सांगितले होते. आपण आरोपांचे पुरावे देऊ ,असे आव्हाव खडसेंना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. या संपूर्ण आरोप प्रत्यारोपांवर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी भाष्य केले. यावेळी त्यांनी अतिशय सूचक विधाने करत पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्त्वावर टीका केली.

भाजपवर नाराज नेते गोपीनाथ गडावर दाखल

पंकजा मुंडेंसह त्यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, सुरेश धस, रासप अध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ महादेव जानकरही गोपीनाथ गडावर हजेरी लावणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुमार आयलानींचा ओमी कलानीला विरोध का?

News Desk

जर आपण कवडीमोलाची किंमत नसलेल्या नातवाचं ऐकलं असतं तर…अतुल भातखळकरांचे पवारांना प्रत्युत्तर

News Desk

या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आहे, राणेंची मुख्यमंत्र्यावर जहरी टीका  

News Desk