HW News Marathi
मनोरंजन

बीग बी अमिताभ यांच्याकडून मुंबई स्पीरिटचे कौतुक

मुंबई : ‘मुंबईतील सकाळची भयाण शांतता… आणि आता पुन्हा पाऊस सुरू झालाय… पण मुंबईकरांचं धैर्य काही औरच आहे…जय हिंद’, अशा शब्दांत बॉलिवूडचा सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन याने मुंबईकरांच्या स्पीरिटचे कौतुक केले आहे. काल दिवसभर थैमान घालणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक लोक ठिकठिकाणी अडकून पडले होते. या काळात मुंबईकरांनी मदतीसाठी पुढे येत एका वेगळ्याच धैर्याचे दर्शन घडविले. बीग बीनी ट्विटरवरून या धैर्याला सलाम केला आहे.

काल तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक कोलमडली. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी भरल्यानं रस्ते वाहतूकही ठप्प झाली. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. लोकांनी कमरे एवढ्या पाण्यातून वाट काढत कसेबसे घर गाठले. पण कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्यातच काही स्वयंसेवी संस्था, संघटना आणि मंडळांनी नाक्यानाक्यावर लोकांसाठी नाश्ता आणि चहापाण्याची व्यवस्था करून मानवतेचं दर्शन घडवलं. हे सर्व चित्र वृत्तवाहिन्यांवरून आणि सोशल मीडियावरून प्रसारीत होतं होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रेक्षकांच्या अपेक्षांचं रिंगण पूर्ण होईल

News Desk

जाणून घ्या… मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यामागचे वैज्ञानिक कारण

News Desk

हलव्याच्या दागिन्यांनी सजल्या बाजारपेठा

News Desk
राजकारण

शेतकरी आपल्या मागण्यासाठी विधानभवनावर धडणार

News Desk

ठाणे | महाराष्ट्रातील शेतक-यांना आश्वासन दिलेली नुकसानभरपाई त्वरित मिळावी. वन विधायक कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींच्या नावावर जमिनी व्हाव्यात यासह अनेक लोकाभिमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला सुरुवात झाली असून ठाणे ते आझाद मैदान ४५ किमी अंतर पार करून मुंबई विधानभवनावर धडकणार आहेत. मोर्चा आज (२१ नोव्हेंबर)ला सायनच्या सोमय्या मैदानात येणार असून शेतकरी सायनहून उद्या(२२ नोव्हेंबर)ला आझाद मैदानात दाखल होतील.

“आनंद दिघे प्रवेशद्वार “येथील जुना चेकपोस्ट नाका येथून लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे.या मोर्चात संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सांगली, साताऱ्यासह ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले आहेत. आदिवासी माता भगिनींची आजपासून पायी रॅली सुरू झाली आहे. आज(२१ नोव्हेंबर)ला पहाटे ४ वाजल्यापासून ८ वाजेपर्यंत कसारा रेल्वे स्थानकावरून सुमारे आठ ते दहा हजार मोर्चेकरी लोकलने ठाण्याकडे रवाना झाले आहेत. या मोर्चात ५० हजारांहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणारे प्रकाश बारेला यांनी माहिती दिले आहे.

ज्येष्ठ न्यायाधीश बी. जे. कोळसे-पाटील अध्यक्ष असून जलपुरुष राजेंद्र सिंग, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, सुभाष वारे, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, काळू राम काका दोधडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यात राष्ट्र सेवादला, भारत बचाव आंदोलन, विद्यार्थी भारती संघटना यांचे कार्यकर्ते मोर्चा सहभागी होणार आहेत.

 

Related posts

#LokSabhaElections2019 : माझी निवडणूक लढविण्याची इच्छा कायमच आहे !

News Desk

डिजिटल व्यवहारासंबंधी फसवणूकीवर बंदी घालण्यासाठी आरबीआयचे नवे नियम लागू

News Desk

लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली संयुक्त बैठक

News Desk