नवी दिल्ली | दिल्लीतील चांदनी चौक येथील मेट्रो स्टेशनवरून सीआरपीएफचा गणवेश परिधान केलेल्या एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या व्यक्तीचे नाव नदीम खान असे असून तो शामली येथे राहणारा आहे. केंद्रीय औद्योगिक दलाच्या जवानांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या संशयिताला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मी सीआरपीएफचा ट्रेनी असून श्रीनगरमध्ये माझे ट्रेनिंग सुरू असल्याचा दावा या संशयिताने केला. मात्र, त्यांचा हा दावा पूर्णपणे खोटा ठरला आहे.
Delhi: CISF nabbed a man posing as constable of CRPF at Chandni Chowk Metro Station, yesterday. On search, two Aadhar Cards with different date of birth, father’s name & addresses and a mobile phone were recovered from his possession. further investigation is underway. pic.twitter.com/ZAG21znwLl
— ANI (@ANI) April 28, 2019
वेगवेगळ्या जन्मतारखा, वडिलांचे नाव आणि मोबाईल नंबर असलेले २ आधारकार्ड देखील या संशयित व्यक्तीकडे सापडले आहेत. “मी सीआरपीएफचा ट्रेनी असून श्रीनगरमध्ये माझे ट्रेनिंग सुरु आहे. माझ्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी मी शामली येथे आलो होतो”, असे या संशयिताने म्हटले होते. मात्र, चौकशी केल्यानंतर त्याचा हा दावा संपूर्णपणे खोटा असल्याचे समोर आहे. या व्यक्तीच्या आई-वडिलांची प्रकृती ठणठणीत असून तो श्रीनगरमध्ये कोणतेही ट्रेनिंग घेत नसल्याचे देखील समोर आले आहे. दरम्यान, अद्याप तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरूच आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.