HW News Marathi
महाराष्ट्र

अन्न कचऱ्यापासून निर्मित वीजेवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करण्याचा देशातील पहिला मान मुंबईला!

मुंबई | मुंबई महानगराच्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि ‘स्वच्छ – सुंदर मुंबई’ साठी एका पाठोपाठ उपक्रम सुरु करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज आणखी एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. An electric vehicle fast charging station has been added to the project to generate electricity from food waste on Keshavrao Khadye Marg in ‘D’ section. It is the first such charging station in India and was inaugurated by the state’s environment minister and Mumbai Suburban District Guardian Minister Aditya Thackeray today.

मंत्री ठाकरे म्हणाले की, फूड वेस्टमधून निर्मित वीजेचा उपयोग करुन इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करणारे भारतातील हे पहिलेच केंद्र आहे. अशा स्वरुपाचे केंद्र मुंबईतच नव्हे तर राज्यातील शक्य त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेषतः महामार्गांवर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यातून विद्युत वाहनांच्या वापराला चालना तर मिळेलच, सोबत सेंद्रिय, जैविक स्वरुपाच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन देखील होईल, असे त्यांनी नमूद केले.

महानगरपालिकेचा ‘डी’ विभाग आणि एरोकेअर क्लीन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला आहे. हाजी अली परिसरात केशवराव खाड्ये मार्गावर माँसाहेब स्व. सौ. मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ महानगरपालिकेने टाकावू अन्नापासून (फूड वेस्ट) वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे दीड लाख किलोपेक्षा अधिक टाकाऊ अन्नपदार्थांवर प्रक्रिया करुन वीजनिर्मिती करण्यात आली आहे.

या प्रकल्पातून तयार होणारी वीज आता विद्युतभारित वाहनांसाठी अर्थात इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी उपयोगात येणार आहे. या वीजनिर्मिती प्रकल्पाला जोडून इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण देखील पर्यावरणमंत्री ठाकरे यांनी केले. या ठिकाणी चार्जिंगसाठी दोन पॉईंट आहेत, म्हणजेच एकावेळी दोन वाहने आणि तेही जलद गतीने चार्ज होऊ शकतात. माफक दरात ही चार्जिंग सुविधा उपलब्ध असेल. या लोकार्पणप्रसंगी उप आयुक्त (पर्यावरण) सुनील गोडसे, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, एरोकेअर क्लीन एनर्जीचे संस्थापक अंकित झवेरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आदित्य ठाकरे, महाराष्ट्र, महाविकासआघाडी, चार्जिंग स्टेशन,इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज,फूड वेस्ट,बीएमसी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपने स्थायी सदस्य पाठवले सहलीला!

News Desk

शरद पवारांच्या भेटीसाठी राज ठाकरे रवाना, ST कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर होणार चर्चा

News Desk

मुख्यमंत्र्यांनी आता राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे !

News Desk