आपण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल जाणून घेत आहोत. महाराष्ट्रात मतदानाचा एक टप्पा पार पडला तर अजून ३ टप्पे शिल्लक आहे. त्यापैकी दुसरा टप्पा १८ एप्रिलला पार पडणार आहेत. तर २९ एप्रिला शेवटचा म्हणजेच तिसरा टप्पा असणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता सर्व पक्ष, नेते आणि मतदारांनासुद्धा पुढील टप्प्यातील मतदानाची उत्सुकता लागलेली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या टप्यातील अमरावती मतदार संघाबाबत.
उमेदवार कोण ?
अमरावती लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. ज्यामध्ये बड़नेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपुर यांचा समावेश होतो. अमरावती मतदार संघातून यावेळी शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा तर वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाचे अरुण वानखडे आणि इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण २४ उमेदवार अमरावतीतून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत.
अकोल्यामध्ये २०१४ ची स्थिती
अमरावती मतदारसंघामधून २०१४ मध्ये शिवसेनेचे आनंदराव असडूळ, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवनीत राणा तर बहुजन बहुजन समाज पक्षाचे गुणवंत देवपारे हे लोकसभेसाठी उभे होते. त्यापैकी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा ४,६७,२१२ इतक्या मतांनी विजय झाला होता. राष्ट्रवादीच्या नवनीत राणा यांना ३,२९,२८० इतकी मतं मिळाली होती. तर बहुजन समाज पक्षाचे गुणवंत देवपारे यांना ९८,२०० इतकी मतं मिळाली होती. यांच्यातील मतांचा फरक पाहिला तर १,३७,९३२ इतक्या फरकांनी नवनीत यांचा पराभव झाला होता. त्यावेळी शिवसेनेला २८%, राष्ट्रवादीला २०% तर बसपला केवळ ६% मतं मिळाली होती.
अमरावती मतदारसंघातील मतदारांची संख्या
अमरावतील १८,१२,४४९ इतके एकूण मतदार आहेत. या मतदारसंघातील महिलांची संख्या ८,७७,३२३ असून पुरुष मतदारांची संख्या ९,३५,०९० इतकी आहे.
अमरावतीचा इतिहास
अमरावतीचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी गेल्या २५ वर्षांपसून शिवसेनेची सत्ता आहे. अमरावती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. राखीव मतदार संघ होऊन १० वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या २ टर्मपासून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ येथून जिंकून येत आहेत. मात्र यावेळी ही निवडणुक विकास आणि लोकाभिमुख उमेदवार अशा २ मुद्द्यांवर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तेलगू चित्रपट अभिनेत्री नवनीत राणा आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात थेट लढत असणार आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यावर नवनीत राणा ५ वर्षे स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी जनतेशी कायम जनसंपर्क सुरू ठेवला आहे. मात्र विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ हे जनसंपर्क राखण्यात कमी पडल्याची भावनाही येथून व्यक्त होताना दिसते. दुसरीकडे काँग्रेसअंतर्गत गटबाजीचा फटका आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो, असेही बोलले जात आहे.
राजकारणाचा जराही गंध नसणाऱ्या नवनीत राणांनी राजकारणातील खाचखळगे अल्पावधीतच आत्मसात केले आहेत. राणा यांनी २०१४ आनंदराव अडसूळ यांना कडवी टक्कर दिली होती. यावेळी देखील आघडीकडून नवनीत राणा तर शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. तेव्हा हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की शिवसेना आपली सत्ता राखण्यात यशस्वी होते की निकाल काही वेगळे येतात.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.