HW News Marathi
महाराष्ट्र

सिमेंट रस्त्यावर पुन्हा रस्ता

सरकारी निधीचा कंत्राटदाराकडून गैरवापर , माजी सरपंच राठोड यांचा आरोप

विनोद तायडे

वाशिम

वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे विकास कामे सुरू असून ठेकेदाराकडून सर्रास नियमांची पायमल्ली होत आहे .जिल्हा परिषद प्रशासन मात्र निगरगट्ट होऊन उघड्या डोळ्यांनी तमाशा पाहत आहे मेडशी येथे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागा मार्फत तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी 5 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. ठेकेदार ,ग्राम पंचायत प्रशासनाच्या संगनमताने तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत 5 लाख रुपये निधीतून 2014/ 15 मध्ये काम झालेल्या सिमेंट रस्त्यावरच सिमेंट रस्ता बनवून 5 लाख शासन निधीला चुना लावण्यात आला असल्याचा आरोप माजी उपसरपंच मोहन राठोड यांनी केला आहे याबाबत संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणी माजी उपसरपंच मोहन राठोड यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी याना दिलेल्या निवेदनातून केली आहे

येथे बंजारा तांड्यामध्ये 2014/15 ला तांडा सुधार योजने अंतर्गत 5 लाख रुपयाचा सिमेंट रस्ता बनविण्यात आला. 2016/17 ला समाजकल्याण विभागाने तांडा सुधार वस्ती योजनेतून 5 लाख रुपये सिमेंट रस्ता निधीला मंजुरात दिली .येथील ग्राम पंचायत प्रशासनाने कसल्याही प्रकारची चौकशी न करताच .आधीच तयार असलेल्या सिमेंट रस्त्यावर रस्ता बनविण्याचा प्रताप केला. शासन नियमानुसार कामाचे अंदाजकीय तपशील फलक बांधकामावर लावणे अनिवार्य असताना संबधित ठेकेदाराने शासन निर्णयाची पायमल्ली करत थातूर मातूर रस्ता बनवून 5 लाख शासन निधीला चुना लावण्याचे काम केले असल्याचा आरोप माजी उपसरपंचानी केल्याने एकच खळबळ उडाली आहे .

आधीच रस्ता तयार असताना त्यावर फक्त सिमेंट लेप लावण्याचे काम झाल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आमचे हे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु, आठवलेंचा गौप्यस्फोट

News Desk

‘जो संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल, अशा गोंधळी खासदारांना…’ रामदास आठवले

News Desk

मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नाही, ऑनलाईन शिक्षण चालू राहिल – प्राजक्त तनपुरे

News Desk