HW News Marathi
मुंबई

पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला

मुंबई – मुंबईतल्या डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची धक्कायदाक घटना घडली आहे. सूर्यवंशी यांना तीन ते चार जणांनी हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सूर्यवंशी यांच्यावर खारघरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खारघरच्या शिल्प चौकात हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला कोणी केला, का केला हे अद्याप अस्पष्ट आहे. सुधीर सूर्यवंशी हे कारचे टायर पंक्चर झाले म्हणून पंक्चरवाला शोधत होते. त्यावेळी तीन-चार अज्ञात लोक आले आणि त्यांनी सूर्यवंशी यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली.

पत्रकार सुर्यवंशी मारहाणप्रकरण विधानपरिषदेत

सुधीर सूर्यवंशी मारहाण प्रकरणाचा मुद्दा विधानपरिषदेतही उपस्थित करण्यात आला. काँग्रेसचे पुण्यातील आमदार अनंत गाडगीळ यांनी विशेष उल्लेख करुन मारहाणीचं प्रकरण गंभीर असून, सरकारने यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी केली. त्यावर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी ‘या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल’, असं आश्वासन दिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला इंदूमिलची जागा देण्यासाठी 15 वर्ष लागले कुणी बांधले होते का ? : देवेंद्र फडणवीस

swarit

वांद्रे येथील शास्त्रीनगर झोपडपट्टीला पुन्हा एकदा आग

News Desk

हाजी अली दर्ग्याचे लवकरच होणार सौंदर्यीकरण

swarit