HW News Marathi
मुंबई

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा

मुंबई | लव्ह जिहाद (Murder Case) आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी मुंबईत सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा (Hindu Jan Aakrosh Morcha)आयोजित करण्यात आलेला आहे. हिंदू जन आक्रोश मोर्चा आज (29 जानेवारी) शिवाजी पार्क येथून सुरू झाला असून हा मोर्चा कामगार मैदानावर पार पडणार आहे. या मोर्चात  मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याची चित्र पाहायला दिसून येत आहेत. तसेच भाजपच्या बड्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेतेही सहभागी झालेले आहेत

या मोर्चात श्रद्धा वालकर हत्याकांडचा आरोपी आफताबला जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील मोर्चातून केली आहे. या हत्याकांडानंतर लव्ह जिहाद आणि धर्मांतरण कायदा देशात लागू व्हावा, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामुळे वाहतुकीच कोडी होऊ नये म्हणून वाहतुकीच्या नियमन करण्यात आले आहे. या मोर्चात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजप नेते प्रविण दरेकर, आमदार नितेश राणे, प्रसाद लाड यांच्यासह अनेक भाजपचे नेते सहभागी झाले आहे.

या मोर्चाचे नेतृत्व महिला करत असून या मोर्चा जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हम हिंदू है , अशा घोषणा देत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

 

 

 

 

Related posts

मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस

News Desk

मनसेला जशाच तसे उत्तर दिले, संजय निरुपमवर गुन्हा

News Desk

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला मनसे कार्यकत्यांकडून चोप

News Desk